Kokan Swad Logo

कोकण स्वाद

कोकण स्वाद बाय जाधव बंधू "जिथे चव, विश्वास आणि निसर्ग एकत्र येतो."

आमची ओळख

कोकण स्वाद बाय जाधव बंधू

आमच्याबद्दलची माहिती थोडक्यात ऐका

आमच्याबद्दलची माहिती सविस्तर ऐका

कोकण स्वाद बाय जाधव बंधू हा केवळ आंबे विकण्याचा व्यवसाय नाही, तर कोकणच्या मातीचा सुगंध, शेतकऱ्यांच्या कष्टांचा मान आणि ग्राहकांच्या विश्वासातून उभा राहिलेला एक प्रामाणिक प्रवास आहे. आमच्यासाठी हा ब्रँड म्हणजे नफा नव्हे, तर नातं, विश्वास आणि गुणवत्ता यांचा संगम आहे.

या व्यवसायाची औपचारिक सुरुवात 2019 साली झाली. मात्र आंब्यांशी और कोकणशी असलेलं आमचं नातं त्याही आधीपासून जपलेलं आहे. वर्षानुवर्षांचा अनुभव, थेट शेतकरी संबंध आणि ग्राहकांची गरज ओळखण्याची दृष्टी यामुळे हा व्यवसाय भक्कमपणे उभा राहिला.

आज आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, बारामती, सातारा, सांगली, संभाजीनगर व अहिल्यानगर परिसरात देवगड व रत्नागिरी येथील अस्सल हापूस आंबे पोहोचवतो. आमच्यासाठी आंबा म्हणजे आरोग्य, चव, आठवणी आणि कुटुंबाशी जोडलेली भावना आहे.

व्यवसायाची सुरुवात ही एका निर्णयांतून उभा राहिलेला प्रवास आहे.

2019–20 चा काळ संपूर्ण जगासाठीच नव्हे, तर सामान्य माणसासाठीही अत्यंत कठीण होता. कोविड काळात लोक घरात अडकले होते, बाजारपेठ विस्कळीत झाली होती आणि दर्जेदार वस्तू मिळणं आव्हानात्मक झालं होतं. अशा परिस्थितीत घरबसल्या विश्वासार्ह, चांगल्या प्रतीचा आणि ओरिजनल हापूस आंबा मिळावा, ही एक साधी पण महत्त्वाची गरज मनात निर्माण झाली. याच काळात रत्नागिरीतील एका विश्वासार्ह शेतकऱ्याची आंब्याची गाडी पुण्यातील नवले ब्रिज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या शेतकऱ्यांशी ओळख आधीपासूनच होती, कारण याआधी मार्केट यार्डमधील पणन या ठिकाणी “थेट शेतकरी ते ग्राहक” या संकल्पनेअंतर्गत संबंध तयार झाले होते. प्रत्यक्ष ठिकाणी गेल्यानंतर समजलं की कोविड परिस्थितीमुळे त्यांच्या सात पेट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यांनी त्या सर्व पेट्या घेण्याची विनंती केली. त्या क्षणी मनात प्रश्न निर्माण झाला की एवढ्या पेट्यांचं करायचं काय? मात्र घरचे, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांशी संवाद साधला. थोड्याच वेळात चार–पाच पेट्यांसाठी लोक तयार झाले. जोखीम पत्करून सर्व पेट्या घरी आणल्या आणि त्या दोन दिवसांतच पूर्णपणे विकल्या गेल्या. दुसऱ्याच दिवशी आंब्याचे शेतकरी देसाई यांचा पुन्हा फोन आला की उद्या आंब्याची गाडी येणार आहे, तर विक्रीसाठी काही मदत होईल का? यावर आम्ही हो म्हणून सांगितले कारण कोविड काळात जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले होते. त्याचा परिणाम शेती व संबंधित उद्योगांवरही झाला आणि या क्षेत्रात काहीसा ठप्पपणा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद, समाधान आणि विश्वास पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली की हा व्यवसाय आपण यशस्वीपणे करू शकतो. 👉 ही केवळ विक्री नव्हे, तर एका व्यवसायाची सुरुवात होती. हाच तो क्षण होता, जो "कोकण स्वाद बाय जाधव बंधू" या ब्रँडचा खरा पाया ठरला.

ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद, समाधान आणि विश्वास पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली की हा व्यवसाय आपण यशस्वीपणे करू शकतो. 👉 ही केवळ विक्री नव्हे, तर एका व्यवसायाची सुरुवात होती. हाच तो क्षण होता, जो "कोकण स्वाद बाय जाधव बंधू" या ब्रँडचा खरा पाया ठरला.

आमचं काम आणि आमची वेगळी ओळख

आमचं काम सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर आम्ही आमच्या आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या बागेतील देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. या प्रक्रियेत कोणताही अनावश्यक मध्यस्थ नाही. त्यामुळे गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वास टिकून राहतो. आज बाजारात आंब्याच्या नावाखाली अनेकदा ग्राहकांची दिशाभूल होते. दिसायला आकर्षक पण चव नसलेले, कृत्रिम पद्धतीने पिकवलेले आंबे मोठ्या प्रमाणावर विकले जातात. अशा परिस्थितीत ग्राहकांचा विश्वास जपणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. आम्ही ग्राहकाला ज्या दर्जाचा आणि ज्या भागातील आंबा देण्याचं आश्वासन देतो, तोच दर्जा योग्य निवड, नैसर्गिक पिकवण आणि काळजीपूर्वक पॅकिंगसह दिला जातो. हापूसच्या मूळ चवीशी आम्ही कधीही तडजोड करत नाही.

गुणवत्ता आणि नैसर्गिक पिकवण हा आमचा कणा आहे.

आमचे आंबे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतात. योग्य परिपक्वतेवर झाडावरून काढलेले आंबे पेंढ्यामध्ये (आडी लावून) पिकवले जातात. कोणतेही केमिकल किंवा कृत्रिम प्रक्रिया वापरली जात नाही. यामुळे आंब्याची खरी चव, नैसर्गिक सुगंध आणि पौष्टिक मूल्य टिकून राहतात. आमच्या दृष्टीने गुणवत्ता ही केवळ एक शब्द नाही, तर ती आमच्या व्यवसायाची ओळख आहे.

ऑर्डर प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरण

आंब्यांचा हंगाम साधारणतः मार्च ते मे दरम्यान असतो. ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही Pre-booking ची सुविधा उपलब्ध करून देतो. ऑर्डर दुकानातून, फोनद्वारे किंवा WhatsApp वरून घेतल्या जातात. पुणे व परिसरात Home Delivery ची सुविधा दिली जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी आमच्याकडे १ डझन, २ डझन आणि ५ डझनचे आकर्षक बॉक्स पॅकिंग उपलब्ध आहे. तसेच, सण-समारंभ किंवा प्रियजनांना देण्यासाठी विशेष 'Gift Packing' देखील आम्ही उपलब्ध करून देतो. हा व्यवसाय Retail तसेच Wholesale या दोन्ही स्वरूपात केला जातो.

ग्राहकांचा विश्वास आमची खरी ताकद

गेल्या अनेक वर्षांत आमच्याकडे नियमित ग्राहकांचा एक मजबूत आधार तयार झाला आहे. दरवर्षी हेच ग्राहक पुन्हा आमच्याकडे येतात, कारण त्यांना येथे केवळ आंबा नव्हे, तर विश्वास मिळतो. आमच्यासाठी यश म्हणजे मोठी विक्री नव्हे, तर 👉 समाधानी ग्राहक आणि दीर्घकालीन नातेसंबंध..

Vision (आमचे ध्येय)

अस्सल आणि नैसर्गिक हापूस आंब्यांच्या माध्यमातून घराघरात आरोग्यदायी समाधान पोहोचवणे आणि 'कोकण स्वाद' गुणवत्तेचा जागतिक मानदंड (Global Standard) बनवणे.

Vision चे मुख्य पैलू:

● ब्रँड विश्वासार्हता: जेव्हा जेव्हा हापूस आंब्याचा विषय येईल, तेव्हा 'जाधव बंधू' हे नाव विश्वासाचा समानार्थी शब्द म्हणून ओळखले जावे.

● मराठी उद्योजकता: जास्तीत जास्त स्थानिक उद्योजकांना या साखळीत जोडून घेऊन मराठी व्यवसायाचा विस्तार करणे.

Mission (आमचे उद्दिष्ट)

आमची मिशन स्टेटमेंट:

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करून, रास्त दरात सर्वोत्तम प्रतीचा हापूस आंबा थेट बागेतून ग्राहकांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे." आमची मिशन स्टेटमेंट:

● थेट बागेतून पुरवठा: मध्यस्थांची साखळी तोडून थेट देवगड आणि रत्नागिरीतील शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत ताजे आंबे पोहोचवणे.

● नैसर्गिक प्रक्रिया: ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता १००% नैसर्गिक पिकवण पद्धतीचा अवलंब करणे.

● ग्राहक समाधान: केवळ विक्री करणे नव्हे, तर 'आफ्टर सेल्स सर्व्हिस'च्या माध्यमातून ग्राहकांशी दीर्घकालीन नाते निर्माण करणे

● व्यावसायिक पारदर्शकता: प्रत्येक बॉक्समध्ये दिलेला शब्द आणि दर्जा यांची १००% पूर्तता करणे.